सोयगाव : महाविकास आघाडीच्या सोयगावला झालेल्या संवाद यात्रा बैठकीत सिल्लोड-सोयगाव म तदारसंघाची जागा कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यावी, असा निर्णय घेत सोयगावात महाविकास आघाडीच्या संवाद यात्रेला शनिवारी सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी मिळाली तरी एकजुटीने काम करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनिरीक्षक (शरद पवार गट) मूलचंद पवार यांनी कार्यकर्त्यांना यावेळी सांगितले.
यावेळी बैठकीत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) कार्यकर्त्यांनी रंगनाथ काळे यांना सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्याची गळ घातली होती.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सिल्लोड सोयगावात मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीची मूठ घट्ट करण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्ष निरीक्षक मूलचंद पवार यांच्या नेतृत्वाखाली संवाद यात्रा बैठक घेण्यात आली.
या बैठकीला काँग्रेसचे शांतीलाल अग्रवाल, ज्येष्ठ नेते रंगनाथ काळे, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पवार, उध्दव ठाकरे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दिलीप मचे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू काळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष डॉ. इंद्रजित सोळंके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रवींद्र काळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष दिनेश हजारी, ज्येष्ठ नेते राजेंद्र अहिरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
संवाद यात्रा बैठकीत शिवसेना (उध्दव ठाकरे गट) तालुकाप्रमुख दिलीप मंचे, राजू अहिरे, अजय नेरपगारे, भरत पगारे आदींनी सूचना केल्या.
ज्येष्ठ नेते रंगनाथ काळे यांनी येणाऱ्या काळात यापूर्वीच्या चुका बाजुला ठेवून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागावे. तसेच नवीन कार्यकर्त्यांना सोबत घ्या, अशा सूचना दिल्या.
या संवाद यात्रेत महाविकास आघाडीची मूठ घट्ट करून कोणत्याही स्थितीत सिल्लोड- सोयगावची जागा महाविकास आघाडीच्या ताब्यात येण्यासाठी एकमुखी निर्णय कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी घेतला आहे.
बैठकीला कृष्णा जुनघरे पाटील, दीपक देशमुख, राजू पाटील, चंदू काळे, भरत पगारे, सुधीर पठाडे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष रवींद्र काटोले, शरद दाम ोदर, योगेश महाकाळ, शेख शफीक, सुधीर पठाडे, सुधाकर सोहनी, शेख निसार, अलीबाबा तडवी, राजू पाटील, काँग्रेसचे महिला आघाडीच्या विमलताई खैरनार, शोभाबाई पगारे आदी उपस्थित होते.