फेब्रुवारी २०२५ अखेर जळगाव परिमंडलात कृषी ग्राहक वगळता लघुदाब श्रेणीसह अन्य वर्गवारीत तीन कोटी ८७ लाख ग्राहकांकडे सुमारे ९७४ कोटी रुपये देयके थकीत आहेत. आर्थिक वर्ष मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर महावितरण जळगाव परिमंडळात वीजबिल वसुली कामास प्राधान्य देण्यासह कठोर कारवाईच्या सूचना मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी दिल्या आहेत. चालू महिन्याच्या वीजबिलासह थकबाकी यादीत असणाऱ्या ग्राहकांकडील थकबाकीची पूर्णक्षमतेने वसुली करण्याच्या सक्त सूचनाही मुलाणी यांनी दिल्या.
मुख्य अभियंता मुलाणी यांनी गेल्या आठवड्यात परिमंडळातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांतील वित्त व लेखा विभागाचे सहाय्यक व उपलेखापाल, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक यांच्यासह अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते आणि सहाय्यक अभियंत्याची दृकश्राव्य माध्यमातून बैठक घेतली. बैठकीत जिल्हानिहाय थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट देऊन आवश्यकतेनुसार सार्वजनिक पाणीपुरवठा व दिवाबत्तीच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्याच्याही सक्त सूचना दिल्या. जळगाव परिमंडळांतर्गत धुळे जिल्ह्यात एक हजार ३०६ सरकारी कार्यालयांकडे एक कोटी ८७ लाख रुपये, जळगाव जिल्ह्यात दोन हजार ५२७ कार्यालयांकडे तीन कोटी ७९ लाख रुपये, तर नंदुरबार जिल्ह्यात एक हजार ६६ कार्यालयांकडे एक कोटी ९२ लाखांची देयकांपोटी थकबाकी आहे. धुळे जिल्ह्यात सार्वजनिक दिवाबत्तीच्या एक हजार २६१ ग्राहकांकडे थकबाकी आहे. त्यांच्याकडे १३३ कोटी ५० लाख, जळगाव जिल्ह्यात दोन हजार ८३३ जोडण्यांवर १७४ कोटी ५६ लाख, तर नंदुरबार जिल्ह्यात एक हजार ३३८ वीजजोडण्यांवर दिवाबत्तीची १५० कोटी ८९ लाखांची देयकांपोटी थकबाकी आहे.
सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांवरही मोठी थकबाकी आहे. धुळे जिल्ह्यात १ हजार १३९ वीज ग्राहकांच्या जोडण्यांवर १२३ कोटी ८० लाख, जळगाव जिल्हयात २ हजार ३३१ जोडण्यांची २६३ कोटी ३५ लाख थकबाकी आहे. धुळे जिल्ह्यात १ हजार १३९ जोडण्यांवर १२३ कोटी ८० लाख, जळगाव जिल्ह्यात २ हजार ३३१ जोडण्यांची २६३ कोटी ३५ लाख तर नंदुरबार जिल्ह्यांत ८०२ जोडण्यांवर ५४ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी आहे. धुळे जिल्ह्यात ९४ हजार घरगुती वर्गवारीत ग्राहकांकडे १६ कोटी ४५ लाख, जळगाव जिल्ह्यात २ लाख ७५६७ ग्राहकांकडे २८ कोटी ३८ लाख, तर नंदुरबार जिल्ह्यात ४३ हजार ३४८ थकबाकीदार घरगुती ग्राहकांकडे ५ कोटी २२ लाख रुपये थकीत आहेत.
धुळे जिल्ह्यात ६ हजार ३०० वाणिज्यिक ग्राहकांकडे ३ कोटी ९० लाख, जळगाव जिल्ह्यात १३ हजार ६०५ ग्राहकांकडे ४ कोटो ९३ लाख तर नंदुरबार जिल्ह्यात ३ हजार ८० ग्राहकांकडे १ कोटी ९ लाख रुपयांची वाणिज्यिक वापरकर्त्यांकडे वीजदेयके थकीत आहेत. औद्योगीक वर्गवारीतील १५०४ ग्राहकांकडे धुळे जिल्ह्यात २ कोटी ३९ लाख, जळगाव जिल्ह्यात २४३४ ग्राहकांकडे ४ कोटी ४ लाख तर नंदुरबार जिल्ह्यात ४८२ औद्योगीक वीजवापराची ५४ लाख रुपयांची थकबाकी आहे.
अन्य वर्गवारीतील २१७ग्राहक धुळे जिल्ह्यात थकबाकीत असून त्यांच्याकडे १२ लाख थकीत आहेत. जळगाव जिल्ह्यात १२६ ग्राहकांकडे १२ लाख तर नंदुरबार जिल्ह्यात ५३ ग्राहकांकडे ४ लाख रुपयांची थकबाकी आहे. वरील सर्व थकबाकीदार ग्राहक हे सद्यस्थितीत असून काही ग्राहकांचा थकबाकी पोटी तातपुरत्या स्वरुपात वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. परिमंडलातील ग्राहकांनी चालू महिन्याच्या देयकांसह सर्व थकित बिलांचा भरणा करुन वीज पुरवठा खंडित होण्याची अप्रिय कार्यवाही टाळावी असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे
थकबाकीचा बोजा वाढला! महावितरणचे ग्राहकांकडे ९७४ कोटी थकीत
by team
Published On: मार्च 11, 2025 5:56 pm

---Advertisement---