जळगाव : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी जाहीर केली आहे. महावितरणने जळगाव जिल्ह्यात विविध पदांसाठी भरती केली आहे. इच्छुक उमेदवारांना १३ जानेवारीपासून अर्ज करता येणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ जानेवारी आहे.
पदांची संख्या आणि पात्रता
इलेक्टीशियन – ८८ पदे
वायरमन – ३५ पदे
संगणक चालक (कोपा) – १७ पदे
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने १० वी व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आय.टी.आय. इलेक्ट्रीशियन किंवा वायरमन / संगणक चालक (कोपा) उत्तीर्ण असावा.
मागील ३ शैक्षणिक वर्षात (२०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४) उत्तीर्ण झालेले असावे.
किमान गुण
खुल्या प्रवर्गासाठी ६५%
मागासवर्गीयांसाठी ६०%
वयोमर्यादा
१८ ते ३० वर्षे (अनु. जाती व अनु. जमातीसाठी ५ वर्षे शिथिल)
महत्त्वाचे तपशील
अर्ज शुल्क : नाही
पगार: कंपनीच्या नियमांनुसार विद्यावेतन अदा करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण: जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी
अर्ज करणारी व्यक्ती: फक्त जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी उमेदवार
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांसह अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची छायांकित प्रत लघु प्रशिक्षण केंद्र (STC), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एम.आय.डी.सी. जळगाव येथे निर्धारित वेळापत्रकानुसार दाखल करावी.
अर्जाची अंतिम तारीख: १७ जानेवारी २०२५
अधिकृत संकेतस्थळ: www.mahadiscom.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा