मुंबई । महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयांनंतर आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. १४ डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच या विस्ताराचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचेही समजतेय.
मंत्रिमंडळाचे विभाजन
भाजप : २० मंत्री
शिवसेना : १०-१२ मंत्री
राष्ट्रवादी काँग्रेस : १०-१२ मंत्री
खाती वाटप
भाजपकडे गृहखाते राहील.
शिवसेनेच्या कोट्यात पीडब्ल्यूडी (सार्वजनिक बांधकाम) आणि नगरविकास खाती जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीला अर्थमंत्रालय दिले जाऊ शकते.
शिवसेनेची यादी तयार
१४ डिसेंबर रोजी शपथविधी होईल. शिवसेनेचे १२ नेते शपथ घेतील, त्यामध्ये ९ कॅबिनेट मंत्री आणि ३ राज्यमंत्री असतील.
महाआघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन फॉर्म्युल्यावर सहमती दर्शवली आहे, परंतु काही इच्छुक नेत्यांना संधी नाकारली जाऊ शकते. अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असून, हा विस्तार महायुती सरकारच्या आगामी कारभारासाठी निर्णायक ठरू शकतो.
शिवसेनेच्या संभाव्य मंत्रीमंडळाच्या यादीत या नावांची चर्चा
कॅबिनेट मंत्रीपदासाठी संभाव्य नावं : एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाठ, भरत गोगावले, आशिष जयस्वाल.
राज्यमंत्रीपदासाठी संभाव्य नावं: योगेश कदम, विजय शिवतारे, आबिटकर किंवा याड्रावकर मात्र,
ही यादी अद्याप अधिकृत नाही. यावर अधिकृत घोषणा झाल्यानंतरच निश्चित माहिती मिळेल.