Mahayuti Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट; नागपुरात घडामोडींना वेग

मुंबई । महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयांनंतर आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. १४ डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता उद्या  मंत्रिमंडळाचा विस्तार होईल की नाही ? हे पाहावं लागणार आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण

पाच डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयांनंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी राज्यभर उत्सुकता होती. आता नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी जोरात सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज करण्यात आले आहेत.

मंत्री निवासांची व्यवस्था 

रवि भवन परिसर : कॅबिनेट मंत्र्यांसाठी 24 बंगले.
नाग भवन परिसर: राज्य मंत्र्यांसाठी 16 बंगले.

लक्ष मंत्रिपदांच्या वाटपाकडे

उद्या, १४ रोजी च्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राज्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोणाला कोणतं खातं दिलं जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नामनिर्देशांची यादी जाहीर झाल्यावरच या बंगल्यांवर नव्या मंत्र्यांची नेमप्लेट लावण्यात येणार आहे.

राजकीय हालचालींवर नजर

नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीसाठी उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत. यामुळे हिवाळी अधिवेशनाआधी मंत्र्यांची जबाबदारी निश्चित होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

दरम्यान, उद्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराने सरकारची पुढील दिशा आणि ताकद दिसणार आहे, त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निर्णयाकडे आहे.