मोठी बातमी ! उद्या नव्हे, ‘या’ तारखेला होणार मंत्रिमंडळाचा शपथविधी

मुबई । महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयांनंतर आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. आता मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित झाली असून, १५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे.

या विस्तारात अनेक वर्षे संधी न मिळालेल्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

या बैठकीनंतर शपथविधीची तारीख निश्चित करण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होणार असल्यामुळे याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण होणार आहे.

या विस्तारामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे, तसेच महायुती सरकारच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होईल. जुन्या नेत्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यास, सरकारची नवीन प्रतिमा तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.