महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारात ‘हे आमदार’ होणार सक्रिय

जळगाव : जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाचा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. याच वेळी महायुतीच्या प्रचारापासून अंतर ठेवून असलेले आमदार चंद्रकांत पाटील यांची भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेतली. आमदार पाटील यांच्या निवास्थानी झालेल्या या भेटीतून त्यांची नाराजी दूर झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यातून मुक्ताईनगरातून रक्षा खडसे यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळू शकेल अशी चर्चा रंगली आहे.

रक्षा खडसे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेण्याची घोषणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यानंतर, शुक्रवार, ११ रोजी रक्षा खडसे यांनी आमदार पाटील यांचे निवास्थान गाठले. यावेळी दोघ मान्यवरांचे  मनोममीलन होऊन दोघांनी आगामी निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्धार केला. दरम्यान, गुरुवार  ९ रोजी  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.  याचवेळी  आमदार पाटील यांनी प्रचारात सक्रिय होणार असल्याचे या संकेत दिले होते. रक्षाताई आमदार पाटील यांच्या घरी भेट देणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले होते. या अनुषंगाने शुक्रवारी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. पाटील कुटुंबातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर दोन्ही मान्यवरांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह चर्चा केली.  भाजपचे लोकसभाप्रमुख नंदू महाजन, शिवसेनेचे पदाधिकारी छोटू भोई, अफसर खान आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. या भेटीनंतर आमदार चंद्रकांत पाटील आता रक्षाताई खडसे यांच्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सक्रिय होतील, असे स्पष्ट झाले आहे. मागील काही काळात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यासोबत दोन दिवसांपूर्वी भुसावळ येथे झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावल्याने त्यांची नाराजी दूर झाल्याचे स्पष्ट झाले होते.