Main Atal Hoon : पंकज त्रिपाठींचा ‘मैं अटल हूँ’ ओटीटीवर होणार रिलीज

Main Atal Hoon : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित ‘मैं अटल हूँ’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वी सिनेमागृहात हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात अभिनेता पंकज त्रिपाठीने अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे.  विनोद भानुशाली, संदीप सिंग आणि कमलेश भानुशाली यांची निर्मिती असलेला हा सिनेमा अटलबिहारी वाजपेयी यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकतो.

झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं,’शुरू करो तैयारी, आ रहे हैं अटल बिहारी, मैं अटल हूं हा सिनेमा 14 मार्च रोजी रिलीज होणार आहे.’