लखनौ विमानतळावर मोठा अपघात टळला, २८२ हज यात्रेकरू थोडक्यात बचावले

---Advertisement---

 

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर (अमौसी विमानतळ) सोमवारी सकाळी एक मोठा अपघात टळला. सौदी अरेबियन एअर लाईन्सच्या विमानाला लॅण्डिंगनंतर टॅक्सी-वे वर जात असताना त्याच्या डाव्या चाकातून ठिणग्या आणि धुराचे लोट निघू लागले.

हे विमान जेद्दाहून २८२ हज यात्रेकरूंना घेऊन परतले होते. प्रसंगावधान राखत पायलटने तत्काळ एअर ट्रैफिक कंट्रोलला (एटीसी) माहिती दिल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सौदी अरेबियन एअर लाईन्सचे विमान एसव्ही ३८५२ जेद्दा विमानतळावरून लखनौसाठी निघाले होते. या विमानात २८२ हज पात्रेकरू प्रवास करत होते.

रविवारी सकाळी ६.३० वाजता विमान अमौसी विमानतळावर उतरले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रन-वेवर यशस्वीपणे उतरल्यानंतर विमान टॅक्सी-वेकडे जात असताना अचानक त्याच्या डाव्या बाजूच्या चाकातून धूर आणि ठिणग्या निघू लागल्या. ही बाब लक्षात येताच पायलटने तत्काळ एटीसीला याची सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी २० मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---