रविवारी पाकिस्तानातील क्वेट्टाहून तफ्तानला जाणाऱ्या पाक लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सात सैनिक ठार झाले असून २१ जण जखमी झाले. परंतु बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने ९० पाकिस्तानी सैनिकांच्या मृत्यूचा दावा केला आहे.
बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली स्वीकारली आहे. हा हल्ला क्वेट्टापासून १५० किमी अंतरावर असलेल्या नोश्की येथे झाला. या हल्ल्यानंतर लष्कराने या भागात हेलिकॉप्टर आणि ड्रोन तैनात केले आहेत.
शनिवारी लष्कराचा ताफ्या तफ्तानला जात होता. या ताफ्यात सात लष्कराच्या बस आणि इतर दोन वाहने होती, ज्यावर हल्ला करण्यात आला. अहवालानुसार, आयईडीने भरलेले एक वाहन लष्कराच्या ताफ्यातील बसला धडकले. हा आत्मघातकी हल्ला होता.
नोश्की स्टेशनचे एसएचओ जफरउल्लाह सुलेमानी म्हणाले की, प्राथमिक अहवालातून हा आत्मघातकी हल्ला असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांवरून असे दिसून आले की आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन जाणूनबुजून लष्कराच्या ताफ्यावर धडकवले.
त्यांनी सांगितले की मृतांचा आकडा वाढू शकतो. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्याबद्दल बीएलएचा मोठा दावा
बीएलएने एक निवेदन जारी करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे म्हटले आहे. बलुच लिबरेशन आर्मीच्या आत्मघाती तुकडीच्या माजीद ब्रिगेडने नोश्की येथील आरसीडी महामार्गावर पाकिस्तानी सैन्यावर आत्मघाती हल्ला केला. या ताफ्यात आठ लष्करी बस होत्या. यापैकी एक बस स्फोटात पूर्णपणे खाक झाली. या हल्ल्यानंतर लगेचच बीएलएच्या फतेह पथकाने दुसऱ्या लष्करी बसला पूर्णपणे वेढले आणि त्यातील सर्व लष्करी सैनिकांना ठार मारले. अशाप्रकारे, मृतांची एकूण संख्या ९० झाली आहे.