मनमाड पोलिसांची मोठी कारवाई; २४ तलवारी केल्या जप्त

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२२ । मनमाड शहरात दोन तरुण एका स्टॉलवरुन चक्क तलवारी विक्री करत असल्याचे येथील पोलिसांना आढळून आले. त्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेत. या प्रकणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

संदीप बाळासाहेब पवार (वडगांव पंगू, ता.चांदवड) व चरणसिंग भूपिंदरसिंग (27, न्यू कोट आत्माराम, सुलतानविंड रोड, अमृतसर) अशी अटकेतील आोपींची नावे आहेत.

मनमाड पोलिस उपअधीक्षक समीर सिंग साळवे यांनी म्हणाले की, दोघांना ताब्यात घेतले असून बेकायदेशीरपणे तलवार बाळगतांना आणि विक्री करतांना आढळून आल्याने दोघांनाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा जप्त करण्यात आल्याने या तलावारी कुठून आणल्या आणि त्याची विक्री कोणत्या हेतुने करण्यात येत होती? याचाही तपास पोलिस यंत्रणांकडून करण्यात येईल.