सोप्प्या पद्धतीने बनवा मटारची कचोरी

तरुण भारत लाईव्ह । ९ जानेवारी २०२३। थंडीच्या दिवसात गरम गरम पदार्थांवर ताव मारायला आवडतो. आणि थंडीच्या दिवसात हिरवे मटार बाजारात येत असतात. हिरव्या मटार मध्ये कॅल्शिअम हे भरपूर प्रमाणात असतात. हिरवे मटार आपण वेगळ्या वेगळ्या भाज्यांमध्ये घालत असतो  त्यामुळे भाज्यांना अजूनच चव येते. नेहमीच भाज्यांमध्ये मटार घालून खाण्यापेक्षा आपण मटार चा नवीन पदार्थ ट्राय करू शकतो . मटार ची कचोरी हि घरी करून पहायला पण सोप्पी आहे. मटारची काचोरी घरी कशी करायची ते आपण पाहूया.

साहित्य : हिरवे मटार, हिरव्या मिरच्या, आलं, धने जिरे पूड, तेल, मोहऱ्या, हिंग, लाल तिखट

कव्हर बनवण्यासाठी साहित्य : मैदा तेल, मीठ, पाणी

कृती : सर्वप्रथम एका भांड्यात मैदा घालून त्यामध्ये ३ चमचे तेल घालावे नंतर चवीनुसार मीठ आणि साखर घालून पाण्याच्या सहाय्याने पीठ मळून घ्यावे.

हिरवे मटार सोलून ते तेलामध्ये ५ मिनटे परतवून त्यानंतर मटार मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. त्यानंतर हिरव्या मिरच्या बारीक करून घ्याव्या .मटार बारीक झाल्यावर त्यामध्ये आले किसून टाकावे.हिरव्या मिरच्या घालाव्या, त्यानंतर धने जिरे पूड मीठ आणि चवीनुसार साखर घालावी हे सर्व एकत्र घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.

मैद्याच्या पिठाच्या छोट्या गोळ्या करून त्याची पुरी लाटून मटारचे मिश्रण त्यामध्ये भरावे सर्व बाजूनी पॅक करावे आणि त्याची पोळी लाटून घ्यावी. तेल गरम झाल्यावर दोन्ही बाजूनी खुसखुशीत तळून घ्यावी आणि गरमागरम कचोरी सर्व्ह करावी.