---Advertisement---

मोठी बातमी ! मालेगाव ‘व्होट जिहाद’ प्रकरण आता ATS कडे

by team
---Advertisement---

Malegaon : गेल्या महिन्यात  मालेगाव येथील नामको बँकेच्या शाखेत बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून 125 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. हे पैसे ‘व्होट जिहाद’साठी वापरल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या  यांनी केला होता. यानंतर ईडी, सीबीआय, रिझर्व्ह बँक आदी ठिकाणी किरीट सोमय्या यांनी तक्रार देत चौकशीची मागणी केली होती.

देशातील २१ राज्यांतील २०१ बँक खात्यांतून ही १ हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला. या आर्थिक घोटाळ्यातील ६०० कोटी रुपये दुबईला गेल्याचा आरोप करीत विधानसभेच्या निवडणुकीत ‘व्होट जिहाद’साठी यातील १०० कोटी रुपये रोख स्वरूपात वाटप झाले असून, त्याचे मुख्य केंद्र मालेगाव असल्याचा आरोपदेखील सोमय्या यांनी यावेळी केला.

या आर्थिक घोटाळ्याचा मास्टर माईंड मेहमूद भगाड हा फरार आहे. मेहमूद भागड यांना सुमारे 1000 कोटी मिळाले आणि मुंबई, नाशिक, अहमदाबाद, सुरत येथील हवाला ऑपरेटर्सना हस्तांतरित करण्यात आले. व्होट जिहाद मोहिमेसाठी भगाड याने 100 कोटी रोख स्वरूपात काढले आणि ऑक्टोबर 2024 मध्ये विविध संघटना, नेत्यांना वितरित करण्यात आले. तसेच याचा वापर दहशतवादी फंडिंग, ड्रग माफिया, व्होट जिहाद प्रकारच्या हालचालींसह पैशाच्या व्यवहारांसाठी केला जात असल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला आहे. यात एकूण २७ संशयित असून, यातील ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये मालेगावातील सिराज मोहम्मदसह मालेगाव नामको बँक शाखेतील दोघांचा समावेश आहे.

या घोटाळ्या प्रकरणातील  मोठी अपडेट समोर आली आहे.  भाजप नेते  किरीट सोमय्या यांच्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास ATS कडे देण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. मालेगाव व्होट जिहाद फडिंग घोटाळ्याचा तपास ATS महाराष्ट्र पोलिसांकडे हस्तांतरित केल्याबद्दल सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment