---Advertisement---

Jalgaon News: मालोद गावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

by team

---Advertisement---

यावल :  यावल तालुक्यातील मालोद येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पीडीत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मालोद, ता.यावल या गावात 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या भावाकडे आली होती. ही मुलगी मूळची कांडवेल, ता.रावेर येथील रहिवासी असून भावाच्या घरी आलेल्या या अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले व तिचे अपहरण केले. तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---