---Advertisement---
---Advertisement---
नंदुरबार : शहरातील सोनार गल्ली भागात खोटी कागदपत्रे दाखवून सोन्याची नाणी विक्री करणाऱ्या एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. २६ जुलैला सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.
आरिफ शहाबुद्दीन मलिक (२४, रा. दिल्ली) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. आरिफ हा २६ जुलै रोजी सराफ बाजारातील एका दुकानात प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाचे तीन सोन्याची नाणी घेऊन आला होता. ही नाणी आणून त्याने दिल्ली येथील सराफाची खोटी आणि बनावट बिले देऊन नाणी विक्री करण्याचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी पोलिस हवालदार ललित गवळी यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरिफ मलिक (२४, रा. दिल्ली) याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील करत आहेत.
वाहनाच्या धडकेत युवक ठार
नंदुरबार : नंदुरबार ते निजामपूर रस्त्यावर पिंप्रीपाडा फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार झाला. २७जुलै रोजी ही घटना घडली. राहुल साहेबराव पाटील (२७) असे मयत युवकाचे नाव आहे. राहुल पाटील हा जीजे २६ एजे २६३७ या दुचाकीने २७रोजी नंदुरबार ते निजामपूर दरम्यान प्रवास करत असताना पिंप्रीपाडा फाट्याजवळ वाहनाने धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या राहुल पाटील याचा मृत्यू झाला.
तितरी येथे एकास बेदम मारहाण
नंदुरबार : शहादा तालुक्यातील तितरी येथे संदीप मांगिलाल पावरा यास दिनेश ठोबा पावरा (३२) याने मारहाण केली. २७ जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास तितरी शिवारात हा प्रकार घडला. दिनेश याने दारुच्या नशेत काहीएक कारण नसताना संदीप यास बेदम मारहाण केली.