---Advertisement---
जळगाव : गिरणा नदीतून वाळुचा उत्खनन करण्याचा परवाना आहे का? अशी विचारणा करताच ट्रॅक्टर मालकासह तिघांनी तलाठ्यास शिवीगाळ धक्काबुक्की करत कानशिलेत लगावली होती. त्यानंतर ट्रॅक्टर पळवून पसार झाले. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकासह तिघांवर शासकीय कामात अडथळा तसेच कारवाई दरम्यान जबरीने ट्रॅक्टर पळवून नेल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सावखेडा शिवारातील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करुन तिची ट्रॅक्टरमधुन चोरटी वाहतूक हरिविठ्ठलनगर येथे करण्यात येणार आहे, अशी गोपनीय माहिती महसूल अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार सोमवारी (१ डिसेंबर) दुपारी महसूल अधिकारी राजू कडु बान्हे (वय ५३, रा. श्रीधर नगर) हे पिंप्राळा शिवारात खंडेरावनगर येथे रस्त्यावर मार्गस्थ झाले. हरिविठ्ठलनगरकडे जाणारे ट्रॅक्टर दिसताच त्यांनी चालकास थांबविले. वाळू उत्खननाचा परवाना किंवा कशी वाहतूक करीत आहे, अशी विचारणा त्यांनी चालकास केली. तेव्हा ट्रॅक्टर मालक आणि त्याचा साथीदार अशा दोघांनी ट्रॅक्टर का थांबविले ते आमचे आहे, असे म्हणत दोघांनी राजू बान्हे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी बान्हे यांना मारहाण करत शिवीगाळ केली. ट्रक्टर रोखण्याचा प्रयत्न तलाठी बाहे यांनी केला असता चालकाने जबरीने ट्रॅक्टर पळवून नेले.
प्रकार कळताच उपविभागीय अधिकारी नितीन पोलीस गणापुरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ हे घटनास्थळी खाना झाले. त्यांनी प्रकार जाणुन घेतला. याप्रकरणी तक्रारीनुसार मनोज रमेश भालेराव, फैजल खान, बुवा पूर्ण माहित नाही रा. जळगाव) यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा, मारहाण केल्याचा गुन्हा रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते हे तपास करीत आहेत.
गिरणा नदी पात्रात बांभोरी, आव्हाणे, वैजनाथ, टाकरखेडा, सावखेडा, कढोली शिवारात मोठ्या प्रमाणात अवैध वाळुचा उपसा केला जातो असे वारंवार समोर आले आहे.









