Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींचे आवाहन, वाचा सविस्तर

नवी दिल्ली:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा हा 103 वा भाग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, श्रावण महिन्यात देशभरातील सर्व ज्योतिर्लिंग मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जातात. काशी विश्वनाथ मंदिरातील भाविकांची संख्या विक्रम मोडत आहे. दरवर्षी 10 कोटींपेक्षा जास्त लोक काशीला पोहोचत आहेत. ती एक आपली सांस्कृतिक ओळख आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियान  सुरू ठेवण्याचे आवाहन करीत 15 ऑगस्ट रोजी सर्व देशवासीयांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले. पेंटिंगचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, कलाकार प्रभास भाई यांनी एक पेंटिंग बनवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जात असताना काय वातावरण होते, हे या चित्रात दाखवण्यात आले आहे. आपल्याला आपला वारसा जपायचा आहे, तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे.

अमेरिकेने परत केलेल्या मूर्तींबाबत ते म्हणाले की, या मूर्ती 2500 ते 250 वर्षे जुन्या कलाकृती आहेत. चोल काळातील अनेक शिल्पांचा त्यात समावेश असल्याचे मोदींनी सांगितले. गणपतीची 1000 वर्षे जुनी मूर्ती, 1100 वर्षे जुनी उमा महेश्वरची मूर्ती, दगडापासून बनवलेल्या दोन जैन तीर्थंकरांच्या मूर्ती, सूर्यदेवाची मूर्तीही अमेरिकेने भारताला परत केली आहे. यात 16 आणि 17 व्या शतकातील एक कलाकृती आहे. जी समुद्रमंथनाचे चित्रण करते. आपल्या मौल्यवान संस्कृतीशी संबंधित कलाकृती परत करणार्‍या अमेरिकन सरकारचे आभार मानतो.चार हजार महिलांनी केली पुरुष साथीदाराशिवाय हजयात्र हज पूर्ण करून नुकत्याच परतलेल्या मुस्लिम महिलांची पत्रे मला मोठ्या प्रमाणात मिळाली आहेत,

पंतप्रधान मोदी म्हणाले

चार हजार महिलांनी केली पुरुष साथीदाराशिवाय हजयात्र हज पूर्ण करून नुकत्याच परतलेल्या मुस्लिम महिलांची पत्रे मला मोठ्या प्रमाणात मिळाली आहेत या महिलांनी कोणत्याही पुरुष साथीदाराशिवाय किंवा मेहरमशिवाय हज केले. त्यांची संख्या केवळ 50 किंवा 100 नाही तर, चार हजारांपेक्षा जास्त आहे. हा एक मोठा बदल आहे, पूर्वी मुस्लिम महिलांना मेहरमशिवाय हज करण्याची परवानगी नव्हती. मेहरमशिवाय हज करणार्‍या मुस्लिम महिलांसाठी महिला समन्वयकांची नियुक्ती केल्याबद्दल मी सौदी अरेबिया सरकारचे आभार मानू इच्छितो.मादकपदार्थ मुक्त भारत अभियान

जम्मू-काश्मीरमधील म्युझिकल नाईट, चंदीगढचा स्थानिक क्लब, उंचावर बाईक चालवणे, हे ऐकून असे वाटते की, आपण मनोरंजन आणि साहसाबद्दल बोलत आहोत. ही घटना देखील एका सामान्य कारणाशी संबंधित आहे. मादकपदार्थांच्या विरोधात जनजागृती मोहिमेचे हे सामान्य कारण आहे. जम्मू-काश्मीरमधील तरुणांना वाचवण्यासाठी म्युझिकल नाईट आणि बाईक रायडिंग केली जात आहे. चंदीगढच्या क्लबमध्ये मादकपदार्थांच्या विरोधात मोहीम सुरू आहे. पंजाबमध्ये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांमुळे भारतातील मादकपदार्थांच्या सेवनाविरुद्धच्या मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान आहे. मादकपदार्थ मुक्त भारत मोहिमेशी 10 कोटींपेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत. सुमारे दीड लाख किलो मादकपदार्थ नष्ट करण्याचे काम आम्ही केले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्याची किंमत 12 हजार कोटी रुपये होती.

देशातील मिनी ब्राझील

पंतप्रधान म्हणाले की, (Mann Ki Baat) मध्यप्रदेशातील शहडोलच्या विचारपूर गावाला मिनी ब्राझील म्हणतात. कारण, आज हे गाव फुटबॉलच्या उगवत्या तार्‍यांचा बालेकिल्ला बनले आहे. असे अनेक खेळाडू येथून पुढे येत आहेत, जे राष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत. दारुबंदी आणि मादकपदार्थांसाठी ओळखले जाणारे आदिवासी ठिकाण आता फुटबॉलची नर्सरी बनले आहे.