मनोज जरांगे पाटील यांचा उपोषण इशारा ; पोलिसांनी नाकारली परवानगी

जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आजपासून पुन्हा उपोषण करणार  आहेत. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठा संघर्ष उभारला आहे. त्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारन मराठा समाजासाठी स्वातंत्र आरक्षणाला मंजुरील दिली. परंतु, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यासाठी ते आज पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यावर उपसणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी ४ जून पासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने त्यांनी उपोषणाचा निर्णय पुढे ढकलला होता.आजपासून त्यांच्या आंदोलनाला प्रारंभ होत आहे. त्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, तत्पूर्वी परवानगीची गरज नाही मी उपोषणाला बसणार असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

समाजासाठी कठोर आंदोलन करू, हातच काहीही राखून ठेवणार नाही, आम्हाला राजकारण करायचे नाही. मराठा कुणबी एकच असल्याची अधिसूचना सरकारने काढावी. आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. पाच महिने दिले तरीही मागण्या मान्य होऊ शकल्या नाहीत, पाच महिन्याचा काळ मोठा असतो. सर्व पक्षाच्या आमदारांनी आपापल्या पक्षाच्या नेत्यांना आताच सांगा आम्हाला आमचं आरक्षण द्या, नाहीतर विधानसभेत नाव घेऊन उमेदवार पाडू’ असं मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे.