धरणगाव : तालुक्यातील पिंपळे निशाणे, भोद, धानोरा, दोनगाव, साकरे या गावातील अनेक महिलांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.
महिलांच्या पक्ष प्रवेश प्रसंगी जळगाव जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुख माजी नगराध्यक्ष धरणगाव पी. एम. पाटील, मागासवर्गीय सेल जिल्हा प्रमुख माजी सभापती मुकुंद नन्नवरे, शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या जिल्हा सरचिटणीस पुष्पा पाटील, उपतालुका प्रमुख कल्पना पाटील, दोनगाव तालुका संघटक रवींद्र चव्हाण, एकनाथ महाजन,हेमराज पाटील,नानासाहेब नारखेडे, बोरखेड्याचे सरपंच उगलाल पाटील, महिला बचत गटाच्या रूपाली महाजन,निशाणे सरपंच मंगला पाटील, साकरे येथील मनीषा पाटील व अनेक महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व महिला मंडळाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल त्यांचे स्वागत केले व आपल्या ज्याही काही समस्या असतील त्या तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू असे आश्वासन दिले.