मराठा आंदोलकांनी अडवली शरद पवारांची गाडी ; केली ही मागणी

सोलापूर  : शरद पवार यांच्या गाडीला मराठा आंदोलकांनी अडवून जोरदार घोषणाबाजी केली.  ते आज बार्शी दौऱ्यावर असून आंदोलकांनी टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी रोखली होती.

यावेळी आंदोलकांनी शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत असलेली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.  शरद पवार यांची गाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख सागर लोकरे तसेच मराठा आंदोलकांनी अडवली होती . यानंतर पवारांनी कारचा दरवाजा उघडला आणि आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले .  याप्रसंगी पवारांनी यावेळी माझा पाठींबा आहे, अशी स्पष्टोक्ती दिली. यानंतर पवारांची गाडी आंदोलकांनी सोडत घोषणा दिल्या.

दरम्यान, मराठा आंदोलकांनी  मु गट या गावात एका कार्यक्रमांत भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांना देखील मराठा आरक्षणाबाबतची भूमिका मांडण्यास सांगण्यात आले. आरक्षणासाठी तुम्ही काय केलं?, आरक्षण देण्यासाठी इतका वेळ का लागतो असा सवाल आंदोलकाने केला आहे. आमच्या योद्धाची प्रकृती खालावत आहे , आरक्षण वेळेत दिलं तर विधानसभेत तुमच्या सोबत नाही तर तुमच्या विरोधात असे आंदोलकांनी निदर्शनास आणून देत धारेवर धरले.