बोदवड : मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. मराठी भाषेला अधिकाधिक संपन्न करण्यासाठी व तिच्या समृद्धीसाठी अनेक साहित्यिक, संत, महात्म्यांनी आपले जीवन व्यतीत केले. तसेच प्रत्येकाने मराठी भाषेतील साहित्याचा अभ्यास करून जगभरात मराठी भाषेचा नावलौकिक केला पाहिजे असे विचार देखील मांडले आहेत.
मराठी भाषाही आज न्यायालयाची भाषा झालेली आहे. भारतात हिंदी, बंगाली यानंतर बोलली जाणारी मराठी ही तिसऱ्या क्रमाकाची भाषा आहे. आज सर्वाच्च न्यायालयाचे न्याय निर्णय आपल्याला मराठी या पर्यायी भाषेत उपलब्ध करून दिले जात आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. जगात 135 देशात मराठी भाषा बोलली जाते.
हेही वाचा : ऐकावं ते नवलचं! आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ, सोनोग्राफी रिपोर्टने डॉक्टरही थक्क
बोदवड वकिल संघ व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या पत्रानुसार बोदवड येथिल दिवाणी व फौजदारी न्यायालयात नुकताच मराठी भाषा पंधरवाडा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष न्या.क्यु.ए.एन. सरवरी होते. अर्जुन टी. पाटील (अध्यक्ष बोदवड तालुका वकिल संघ) यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन ॲड किशोर महाजन यांनी केले.
यानिमित्त ॲड. धनराज सी. प्रजापती, ॲड किशोर महाजन, ॲड. के.एस.इंगळे, यांनी मराठी भाषेवर आपले मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमास उप शिक्षीका रेणुकादेवि विद्यालय वनिता अग्रवाल, यांनी मराठी भाषेचे महत्व विशेद केले. ॲड मिनल अग्रवाल, न्यायालयीन कर्मचारी वर्ग, पक्षकार वर्ग, कार्यक्रम समन्वयक अविनाश राठोड,योगेश पाटील, एस के बेदरकर, एस एस भट , व्ही.एन.गरड, स्टेनो राहुल सावळे, टी.पी.वानखेडे, एस के बेलदार, संतोष पाटील हे कार्यक्रमास उपस्थित होते.