March 31 Financial Deadline : 31 मार्चपूर्वी करून घ्या ‘हि’ कामे…नंतर होऊ शकते मोठे नुकसान

March 31 Financial Deadline : आर्थिक वर्ष 2023-24 चा हा शेवटचा आठवडा आहे आणि नवीन आर्थिक वर्ष एप्रिलपासून सुरू होईल. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अनेक आर्थिक कामांची मुदत संपणार आहे, जी पूर्ण करणे आवश्यक आहे. असे न केल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. यामध्ये अनेक कामे कर नियोजन आणि आयकराशी संबंधित आहेत. याबद्दल जाणून घ्या-

1. TDS भरणे पूर्ण करा
करदात्यांना 31 मार्चपूर्वी टीडीएस प्रमाणपत्र जारी करावे लागेल. या प्रमाणपत्रात विविध कर कपातीची माहिती द्यावी लागेल. यासोबतच करदात्यांना चालान स्टेटमेंट भरण्याबाबतची माहितीही टाकावी लागेल.

2. अपडेटेड आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख
31 मार्च ही मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी अपडेटेड आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जर काही चूक झाली असेल, तर तुम्ही अपडेट रिटर्न भरून ती दुरुस्त करू शकता.

3. किमान शिल्लक ठेवा
तुम्ही पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी योजनेसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल आणि या आर्थिक वर्षात एक रुपयाही गुंतवला नसेल, तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. जर तुम्ही 31 मार्चपर्यंत किमान शिल्लक राखली नाही तर अशा परिस्थितीत तुमचे खाते गोठवले जाईल.

4. फास्टॅग केवायसी पूर्ण करा
तुम्ही अजून फास्टॅग केवायसी पूर्ण केले नसेल, तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅग केवायसी पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२४ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. तुम्ही असे न केल्यास, तुम्ही १ एप्रिलपासून तुमचा फास्टॅग रिचार्ज करू शकणार नाही.