Margashirsha 2024 : कधीपासून सुरु होणार मार्गशीर्ष महिना? जाणून घ्या तिथी आणि महत्व

#image_title

Margashirsha 2024 Tithi : हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष हा मराठी महिन्यातील नववा महिना असून. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यला विशेष महत्व आहे. व्रत वैकल्याचा महिना म्हणून मार्गशीर्ष महिन्याची ओळख आहे. धनाची दैवी माता लक्ष्मीला हा महिना समर्पित आहे. मार्गशीर्ष मध्ये प्रत्येक गुरुवारी व्रत केले जाते. या महिन्यात केले जाणारे शुभ कार्य अत्यंत लाभदायी ठरते. वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करुन कुटुंबात समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते. त्यानुसार जाणून घेवूया यंदा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरु होतोय.

मार्गशीर्ष महिना प्रारंभ तिथी
पंचांगनुसार कार्तिक अमावास्येनंतर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते. त्यानुसार मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी २ डिसेंबर रोजी आहे. या तिथीपासून मार्गशीर्ष महिना या सुरु होईल. तसेच या दिवशी देव दिवाळी देखील साजरी होणार आहे. मार्तंडभैरवषड् रात्रोत्सवारंभ देखील सुरु होईल.

मार्गशीर्ष महिना महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णामुळे मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या काळात उपवास आणि नामस्मरण केल्याने अधिक चांगले फल मिळते. तसेच भगवद् गीतेचे पठण करायला हवे. मार्गशीर्ष महिना धार्मिक दृष्टया खूप महत्वाचा आहे. या महिन्यात लग्न सराई, खंडोबाचे नवरात्र,देवदिवाळी, महालक्ष्मीचे व्रत,गीताजयंतीचा उत्सव आणि श्री. दत्तगुरूंचा जन्म सोहळा आणि भोगीच्या दिवसापर्यंत चालणारा धुंधुरमास असे विविध सण-उत्सव साजरे होतात त्यामुळे हा महिना खूप विशेष ठरतो कुठल्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी हा महिना खूपच शुभ मानला जातो.