तरुण भारत लाईव्ह । ११ जानेवारी २०२३ । भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे. सूर्य, चंद्र आणि बृहस्पति हे त्याचे मित्र ग्रह आणि बुधला त्याचे विरोधी ग्रह म्हणतात. मंगळ हा उत्साह, शक्ती, ऊर्जा आणि विवाह याचा कारक मानला जातो. 13 जानेवारीला मंगळ वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्र आणि शनी सामान्य मानले जातात. मृगशिरा नक्षत्र, चित्र नक्षत्र आणि धनिष्ठ नक्षत्र या तीन चंद्र नक्षत्रांचा स्वामीही मंगळ आहे.मंगळ ग्रह मार्गस्थ होत असल्याने काही राशींवर याचा परिणाम होणार आहे ते आपण जाणून घेऊया.
मेष रास: मेष राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक अडचणी सुटू शकतात व त्यांना मानसिक शांती लाभू शकते. विद्यार्थाना परीक्षेत यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना हा काळ आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतो.
मिथुन रास: मिथुन राशीच्या लोकांना हा काळ सर्व प्रकारे यश मिळवून देणारा आहे. या काळामध्ये चांगल्या बातम्या तुम्हाला मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. पैशांची बचत करणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा.
कन्या रास: कन्या राशींच्या लोकांसाठी हा काळ थोडा कठीण असू शकतो. पैसे जपून वापरले पाहिजे. घरात व घराबाहेर वाद टाळले पाहिजे. शब्द जपून वापरा. शक्य असेल तर दूरचे प्रवास करू नका. प्रवास करणं आवश्यक असेल तर प्रवासाला निघण्यापूर्वी जवळच्या देवळात नारळ फोडून त्याचा प्रसाद अर्पण करून मगच प्रवासाला निघा.
सिंह रास: सिंह राशीच्या लोकांना हा काळ मध्यम आहे. व्यावसायिक किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल.