---Advertisement---

Stock Market Closing : बाजार कोसळला, सेन्सेक्स १३९० अंकांच्या घसरणीसह बंद

by team
---Advertisement---

आठवड्यातील पहिल्याच ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले आहे. सेन्सेक्स १,३९०.४१ अंकांनी घसरून ७६,०२४.५१ वर बंद झाला तर निफ्टी ३५३.६५ अंकांनी घसरून २३,१६५.७० वर बंद झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या २ एप्रिल रोजी जगातील अनेक देशांवर परस्पर कर लादण्याची घोषणा करणार आहेत. यामुळे भारतासह जगभरातील शेअर बाजार चिंताग्रस्त आहेत . 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ ही देखील भारतीय शेअर बाजारासाठी एक नकारात्मक बातमी होती. ब्रेंट क्रूडच्या किमती १.५१ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७४.७४ डॉलरवर पोहोचल्या, ज्यामुळे भारताच्या आयात बिलाबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

कोणते शेअर्स घसरले ?
युको बँक,आयपीसीए लॅब्स,व्होल्टास,एचसीएल टेक्नॉलॉजीज, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स हे निफ्टीतील या शेअर्स मध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.

कोणते शेअर्स वधारले ?
इंडसइंड बँक, ट्रेंट, बजाज ऑटो, जिओ फायनान्शियल आणि एचडीएफसी लाईफ, अतुल ऑटो,एचएलई ग्लासकोट,गॉडफ्रे फिलिप्स,समॅन कॅपिटल,या शेअर्स मध्ये वाढ झाली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment