बाजार समिती निकाल : पारोळामध्ये ‘मविआ’चे वर्चस्व

पारोळा : येथील बाजार समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मार्केट बचाव पॅनलने १५ जागा मिळवून बाजार समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेना शिंदे गटाच्या जयकिसान पॅनलला ३ जागा मिळाल्या.

विद्यमान बाजार समिती सभापती अमोल चिमणराव पाटील यांना ३१६ मते मिळाली असून, ते पराभूत झाले आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांना ४०२ मते मिळाली असून, ८६ मताधिक्याने विजयी झाले आहे. सेवा सहकारी मतदारसंघात सर्वसामान्य गटातून माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांना ४७६ मते मिळाली असून, ते विजयी झाले आहेत.

विजयी उमेदवार
सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून नगराज पाटील ४००, पुरुषोत्तम पाटील ३९०, प्रकाश पाटील ३८४, बबन पाटील ४२८, रवींद्र पाटील ४३०, डॉ. सतीश पाटील ४९०, रोहन मोरे ४८५. महिला राखीव मतदारसंघातून : बबीता पाटील ४२३, रेखा सतीश पाटील ४९५. इतर मागासवर्गीय मतदारसंघातून डॉ. हर्षल माने ४०२, सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून सुरेश वंजारी ४४५. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून मनोराज पाटील ३७१, सुधाकर पाटील ३९३.

ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून लक्ष्मीबाई रामोशी ३६१. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक निंबा पाटील ३५८. व्यापारी मतदारसंघातून अनिल मालपुरे ५५. जितेंद्र शेवाळकर ५५. हमाल मापाडी मतदारसंघातून राजू मराठे ६७ अशा उमेदवारांनी विजय संपादन केला.