---Advertisement---

बाजार समिती अपडेट!

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यातील ६ बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतमोजणी आज पार पडत आहे. जळगाव बाजार समितीमध्ये आता हाती आलेल्या अपडेटनुसार महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून भाजपा पिछाडीवर आहे.

जळगाव बाजार समितीची मतमोजणी सुरू असून बाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.  आता हाती आलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत गटात पंकज पाटील – शिवसेना, मिलिंद चौधरी – भाजप, दिलीप कोळी – महाविकास आघाडी, रवी देशमुख – अपक्ष तसेच सर्वसाधारण गटात सुनील महाजन व लकी टेलर यांना मोठी आघाडी आहे.

सोसायटी मतदार संघात ७ जागांवर देखील महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून भाजप, शिवसेना अजूनही पिछाडीवर आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment