Stock market closed: अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारात अस्थिरता, निफ्टी 23,500च्या जवळ बंद

Stock market closed: केंद्रीय अर्थसंकल्प-२०२५ शनिवार, १ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. आज दिवसभर बाजारात अस्थिरता राहिली. शेअर बाजाराने सुरुवात वाढीने केली आणि अर्थसंकल्पादरम्यान निफ्टी २३,६०० च्या वर पोहोचला. मिडकॅप शेअर्समध्येही चांगली खरेदी दिसून आली. पण नंतर बाजारात तीव्र उलटफेर झाली आणि शेवटी मिश्र बंद होण्याचे संकेत मिळाले. कृषी आणि शिपिंग क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पात  मोठ्या घोषणा झाल्या आहेत.

आजच्या व्यवहारात देशांतर्गत शेअर बाजारात दिवसभर तीव्र चढउतार दिसून आले. अर्थसंकल्पीय भाषण सुरू झाल्यानंतर बाजारात तेजी दिसून आली, परंतु त्यानंतर बाजारात मिश्र संकेत दिसून आले.  सेन्सेक्स ८४ अंकांनी वाढून ७७,५८५ वर बंद झाला. निफ्टी १३ अंकांनी घसरून २३,४९४ च्या आसपास आणि बँक निफ्टी ४९,५१८ वर बंद झाला. मिडकॅप निर्देशांक २८२ अंकांच्या घसरणीसह ५३,४२९ वर बंद झाला. निफ्टी स्मॉलकॅप १०० ३५ अंकांच्या वाढीसह १६,९४५ वर बंद झाला.

कोणते शेअर्स वधारले ?
निफ्टीवर ट्रेंट, आयटीसी हॉटेल्स, मारुती, टाटा कंझ्युमर, आयशर मोटर्स, बीएसई सेन्सेक्सवर ब्लू स्टार, थिरुमलाई केमिकल्स, झेन्सार टेक, वोक्हार्ट फार्मा, गॉडफ्रे फिलिप्स या शेअर्स मध्ये वाढ दिसून आली. तर बीईएल, पॉवर ग्रिड, एलटी, सिप्ला, ग्रासिममध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली.