भुसावळ ः तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नाच्या आमिषाने 2019 ते 2023 दरम्यान वेळोवेळी अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली. संशयिताला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता 25 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तालुक्यातील एका गावात 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. संशयित रुपेश मंगल पाटील (भुसावळ तालुका) याने 8 फेब्रुवारी 2019 ते 2 ऑगस्ट 2023 दरम्यान तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. तसेच तू माझ्यासोबत नाही आली तर तुझ्या घरच्या लोकांना त्रास देईल, अशी धमकी दिली. तरुणीने हा प्रकार घाबरून घरच्यांना सांगितला नाही, मात्र संशयीताचा त्रास असह्य झाल्याने तरुणीने कुटुंबियांसह बुधवार, 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्यानंतर रुपेश मंगल पाटील याच्याविरोधात अत्याचारासह पोस्को व ॲट्रासिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे करीत आहे.