---Advertisement---
जळगाव : कपड्यांच्या दुकानातून कपडे बदलून येते, असे कुटुंबीयांना सांगून दहा वर्षीय मुलीला सोबत घेत बत्तीस वर्षीय महिला घराबाहेर पडली. त्यानंतर बेपत्ता झाली. गुरुवारी (१२ जून) दुपारी दोन वाजता ही घटना एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडली.
---Advertisement---
उशिरापर्यंत महिला घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला असता तपास लागू शकला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली. हवालदार किरण पाटील हे तपास करीत आहेत.
बसस्थानकातून बेपत्ता
जळगाव : नवीन बसस्थानकात चोपडा तालुक्यातील अडावद येथून आलेला ४४ वर्षीय तरुण बेपत्ता झाला. ही घटना सोमवारी (९ जून) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली. हवालदार भटू पाटील हे तपास करीत आहेत.