---Advertisement---

पैसे आण, सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ, गुन्हा दाखल

---Advertisement---

---Advertisement---

जळगाव : हुंडा म्हणून कबूल केलेली रक्कम व सोने न आणल्याने २९ वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळींकडून छळ करीत तिला मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी विवाहितेने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

भाग्यश्री प्रणेश ठाकूर (२९) या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ करीत तिला मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार सन २०२२ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी विवाहितेने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

विवाहितेचा पैशांसाठी छळ

जळगाव : माहेरून पाच लाख रुपये आणावे, यासाठी लीना राजेश्वर महाजन (२८) या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ केला. हा प्रकार सन २०१७ ते २०२४ दरम्यान सुरू होता.

याप्रकरणी विवाहितेने शनी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती राजेश्वर महाजन याच्यासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रतिभा पाटील करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment