---Advertisement---
जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून सासरस्यांकडून विवाहित महिलांचा छळ होत असल्याच्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अशात पुन्हा जळगावात अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे माहेरुन १० लाख रुपये आणावे, यासाठी २० वर्षीय विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करुन फारकत करुन टाकु, असे धमकाविले. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
२ मे २०२४ ते ६ डिसेंबर २५ दरम्यान सासरी (कन्नड येथे तसेच ख्वॉजानगर हुडको पिंप्राळा) विवाहितेकडे १० लाख रुपये माहेरुन आणण्याची मागणी वेळोवेळी सासरच्या लोकांनी केली. यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. हा त्रास असह्य झाल्याने विवाहितेने तक्रार दिली.
पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी पीडित महिलेकडून प्रकार जाणुन घेतला. त्यानुसार शेख नविद शेख अक्रम, अक्रम शेख, शाहीनबी शेख अक्रम, कमरुनिसा शेख अरशिद, शेख अरशिद, जाविद शेख अक्रम, मुस्कानबी शेख जाविद, जुनेद शेख अक्रम यांच्यासह सासरच्या दहा जण (सर्व रा. उरुस मैदान समोर कब्रस्तानजवळ कन्नड) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार कालसिंग बारेला तपास करीत आहेत.
सतत करायचे छळ
माहेरुन १० लाख रुपये आणावे, यासाठी विवाहितेचा सतत मानसिक व शारीरिक छळ करुन फारकत करुन टाकु, असे धमकाविले. या जाचाला कंटाळुन विवाहितेने सासरस्यांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.









