---Advertisement---

विवाहितेला कॅफेवर नेऊन केला अत्याचार, एका विरोधात गुन्हा दाखल

---Advertisement---

---Advertisement---

अकोला : येथील एका कॅफेत महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. अकोला शहरातील जीएमडी व्यापारी संकुलातील असलेल्या एका कॅफेत ही घटना घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका २९ वर्षीय तरुणाने ३३ वर्षीय विवाहितेवर अत्याचार केलेत. या प्रकरणी अत्याचार करणाऱ्या शुभम टाले याच्याविरुद्ध सिव्हिल लाईन पोलिसात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

असे आहे प्रकरण


एका ३३ वर्ष विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, या महिलेचा पती सतत दारु पिऊन तिला मारहाण करीत होता. यामुळे ती आपल्या पतीपासून वेगळी राहू लागली होती. याचवेळी या महिलेची सोशल मीडियावर शुभम टाले सोबत ओळख झाली. पुढे या ओळखीचे रूपांतर त्यांच्या मैत्रीत झाली. याकाळात शुभमने लग्नाचे आमिष दाखवित तिला पतीपासून वेगळे होण्यास सांगितले. काही दिवसांनंतर शुभमने अकोल्यातील एका कॅफेत या विवाहित महिलेला नेत तिच्यावर अत्याचार केला.

---Advertisement---

पुढे त्याने याच कॅफेत तिच्यासोबत वारंवार शारिरीक संबंध ठेवले. यानंतर महिलेने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. यावेळी त्याने महिलेला शिवीगाळ व मारहाण देखील केली. लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध केले. संबंधित महिलेने अकोल्यातल्या सिव्हिल पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून. आरोपी शुभम गजानन टाले याच्याविरुद्ध ६४,६४(२) (m) BNS या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

अकोला शहरात अनेक कॅफे असे आहेत जेथे मुला मुलींना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचे उघड झाले आहे. तर काही कॅफेमध्ये अल्पवयीन मुला मुलींचे अश्लील चाळे चालत आहे, अशा स्वरूपाच्या तक्रारी आमदार नितीन देशमुख यांच्याकडे आल्या होत्या. तक्रारींमध्ये वाढ झाल्याने त्यांनी अकोल्यातील जवाहर नगर भागातील कॅफेंला अचानक भेट दिली होती.

यावेळी त्यांनी या कॅफेची तपासणी देखील केली होती. या तपासणी दरम्यान अल्पवयीन तरुणाई अश्लील चाळे करत असल्याचे उघड झाले होते या संदर्भात देशमुखांनी महापालिका आयुक्त तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनाही कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, तरीही अनेक कॅफेमध्ये सर्रासपणे गैरप्रकार सुरू असल्याच पुन्हा एकदा उघड झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment