जळगाव : तू मला आवडत नाही, तुझ्या बापाने मला हुंडा दिला नाही. आता नवी मोटारसायकल मला घ्यावयाची आहे. वडिलांकडून माहेरून एक लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत विवाहितेचा सासरी पतीसह पाच जणांनी मानसिक व शारीरिक छळ केला.
या जाचाला कंटाळून २४ वर्षीय विवाहितेने तालुका पोलीस ठाण्यात कैफियत मांडली. या प्रकरणी सोनखेडी (ता. अमळनेर) येथील पती नितीन पाटील, दीर हर्षल, सासू निर्मला पाटील यांच्यासह नणंद, नंदोई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक मनीषा उमराणे तपास करीत आहेत.
विनाकारण मारला दगड
जळगाव : काहीएक कारण नसताना संशयितांनी शिवीगाळ करत दगड मारला. यात चालक जखमी झाला. मंगळवारी (२५ मार्च) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना शहरातील मेहरूण बगीचा परिसरात घडली. यात आकाश शांताराम भोई (वय २२, रा. कुंभारवाडा, मेहरूण) हा चालक जखमी झाला. या प्रकरणी तक्रारीनुसार सोहम ठाकरे, विक्रम धनसिंग शिंदे यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार सचिन पाटील तपास करीत आहेत.