Breaking : जळगावात आम आदमी पार्टी पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

जळगाव :  आगामी विधान सभेची निवडणूक तोंडावर असल्याने सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीस प्रारंभ झाला आहे. कार्यकर्त्यांना कामे नेमून देत जबाबदारी सोपण्यात येत आहे. त्यातच आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी व सदस्यांनी विश्वासात घेत नसल्याचे कारण सांगत सामूहिक राजीनामा दिला आहे.

आम आदमी पार्टीच्या नवनियुक्त जळगाव जिल्हा उपाध्यक्ष, पदाधिकारी व इतर सदस्य तसेच महानगरातील पदाधिकारी व इतर सदस्य यांच्या सामूहिक राजीनामा पत्राने आम आदमी पार्टीला खिंडार पडले आहे.

जिल्ह्याची कार्यकारणी अधिकृतरित्या पुन्हा आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सह प्रभारी गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शनाने १८ जून २०२४  रोजी गठीत करण्यात आली. मात्र, पार्टीतील अंतर्गत राजकारण आणि काम करण्यास रोखण्याच्या मनोवृत्तीला कंटाळून नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य तसेच जळगाव महानगरातील पदाधिकारी व सदस्य यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे.

जळगाव जिल्हा उपाध्यक्ष व महानगर अध्यक्ष अमृता नेतकर, अनिल वाघ सर, रईस कुरेशी,ऍड. विजय दाणेज, सोशल मीडिया प्रमुख इरफान शेख, तौसिफ खान, लोकमान लोखंडवाला तसेच इतर पदाधिकारी व सदस्यांनी उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री यांना राजीनामा सुपूर्त केला आहे.