तरुण भारत न्युज : धर्मांतरच्या घटना या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. त्यातच उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातील धर्मांतरणाची घटना समोर आली आहे. मदरशाच्या मौलवीला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणी ही अल्पवयीन विद्यार्थिनी आहे. कारी मोहम्मद अहमदवर एका विद्यार्थिनीवर बलात्कार आणि तिला अंमली पदार्थ पाजून अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. यानंतर त्याने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच या प्रकरणाची माहिती कोणाला ही दिल्यास जादूटोणा करून कुटुंबाचा नाश करण्याची धमकी मौलवीने पीडितेला दिली. २६ जून रोजी पीडितेने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी मौलवीला अटक करण्यात आली.
मौलवी चालवीत असे मदरसा.
मौलवी कारी मोहम्मद अहमद अनेक दिवसांपासून आपल्या घरात मदरसा चालवत होता. अल्पवयीन पीडिताही त्याच्या मदरशात जात असे. मौलवीच्या अश्लीलतेला आणि विनयभंगाला कंटाळून तिने २०१८ मध्येच मदरशात जाणे बंद केले. मात्र मौलवी पीडित तरुणीला कोणत्या ना कोणत्या बहाण्याने बोलावून अश्लील कृत्य करायचा.
पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की.
२२ जानेवारी रोजी मौलवीने पत्नी आजारी असल्याच्या बहाण्याने पीडितेला घरी जेवण बनवण्यासाठी बोलावले. यादरम्यान त्याने पीडितेला अंमली पदार्थ पाजले, त्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर मोहम्मद अहमदने मद्यधुंद अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओच्या बहाण्याने मौलवी अनेकदा पीडितेला ब्लॅकमेल करू लागला. १७ मे रोजी पुन्हा एकदा मौलवींनी मुलीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. अखेर या छळाला कंटाळून पीडितेने सर्व प्रकार घरच्यांना सांगितला.
हा मौलवी स्वत:ला जादूटोण्यात निपुण म्हणवून घेत असे, असा आरोप पीडितेने केला आहे. जेव्हा जेव्हा ती मौलवीच्या कृतीला विरोध करत असे तेव्हा तो तिला आणि तिच्या कुटुंबाला जादूटोणा करण्याच्या धमक्या देत असे. पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे की, ते मौलवीला घाबरतात. पोलिसांनी २७ जून मौलवी कारी मोहम्मद अहमदला अटक केली. आरोपींवर आयपीसीसह पॉक्सो कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. मौलवीला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.