जळगाव : जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले होते. आज जळगाव, अमळनेर, पाचोरा, बोदवड, यावल, धरणगाव या ६ बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. यामध्ये अमळनेर बाजार समितीत महाविकास आघाडी ११, भाजप ६, अपक्ष १ उमेदवार विजयी झाले आहेत.
अमळनेर बाजार समितीवर महाविकास आघाडीने वर्चस्व सिद्ध केले असून विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलला सात जागा तर भाजपतर्फे माजी आमदार स्मिता वाघ व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्खावाली असलेल्या पॅनलला एक जागेवर विजय मिळाला आहे.
यात सूत्रानुसार मिळालेल्या माहितीवरून स्मिता वाघ ७२६, अशोक पाटील ७२१, सुभाष पाटील ६५६ सुरेश पाटील ५०७, डॉ. अशोक हिम्मत पाटील ४२१, नितीन पाटील ४०९, भोजमल पाटील ३९४ हे उमेदवार सोसायटी मतदार संघातून विजयी झाल्याचे वृत्त आहे. तर महिला मतदार संघात सुषमा देसले ६३४, पुष्पा पाटील ५९३ यांचीही वर्णी लागल्याचे वृत्त आहे.