APMC Election : जळगावात १८ पैकी ११ जागांवर ‘मविआ’ विजयी

जळगाव : जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले होते. आज जळगाव, अमळनेर, पाचोरा, बोदवड, यावल, धरणगाव या ६ बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. यामध्ये जळगाव बाजार समितिफेर मोजणीत सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. महाविकास आघाडी ११, महायुती ६, अपक्ष १ उमेदवार विजयी झाले आहेत.     

यामुळे अगदी प्रतिष्ठेची करण्यात आलेल्या या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने विजय संपादित केला आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या महाविकास आघाडीला 11 जागा मिळाल्या आहेत. तर सहा जागांवर शिंदे भाजपा निवडून आले आहेत. एक जागा ही अपक्ष म्हणून निवडून आली आहे.

बाजार समिती निवडणूक ही मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखली जाते कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे मतदान असते अशावेळी या निवडणुकीमध्ये बसलेल्या फटक्यामुळे येत्या काळात जळगाव तालुकामध्ये गुलाबराव पाटील यांना संघर्ष करावा लागणार हे नक्की झाले आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीने या निवडणुकीमध्ये अनपेक्षित रित्या घवघवीत यश मिळवले आहे. महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी ही निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ने आपल्या पदरात ११ जागा निवडून आणल्या आहेत तर महायुतीला म्हणजेच शिंदे-भाजपला जोरका धक्का देत त्यांना केवळ सहा जागी निवडून येता आले आहे.