22 जानेवारीला होणार महापौर पदाची आरक्षण सोडत, 29 महानगरपालिकांचं सत्ता सूत्र ठरणार… कोण होणार महापौर ?

---Advertisement---

 

राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या नुकत्याच पार पडल्या असून यात महायुतीला चांगलं यश मिळाल्याच आपल्याला पाहायला मिळालं मात्र आता खरी राजकीय उत्सुकता कशाची असेल तर ती म्हणजे कोण होणार महापौर ? आणि याचसाठी येत्या गुरुवारी 22 जानेवारीला महापौरपदाची आरक्षण सोडत ही जाहीर होणार असून यातूनच राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांचे सत्ता सूत्र हे ठरणार आहे. याबाबतचे पत्र महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून जारी करण्यात आलेलं आहे. २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेला मंत्रालयात नगर विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये महापौर पदाचे आरक्षण निश्चित केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापौर पद कोणाच्या पदरात पडणार हे येत्या ३१ जानेवारी पर्यंत स्पष्ट होणार आहे .

महानगरपालिका मधील महापौर पदाच्या आरक्षणावरून सध्या अनेक राजकीय हालचालींना वेग आला असून कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होणार तर महापौर पद कुणाच्या वाटेला जाणार ? याबाबत चांगलीच धाकधूक वाढली आहे.

राज्यातील 29 महानगरपालिकातील महापौर पदाची आरक्षण सोडत कशी होणार ? जाणून घेऊया.. ⬇️

1. महापौरपदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने निघणार आहे.

2. साधारणत: मागील २० वर्षांचे आरक्षण लक्षात घेतले जाणार आहे.

3. जे आरक्षण याआधी त्या महापालिकेत होते, ते वगळता इतर आरक्षणाची चिठ्ठी असणार आहे.

4. एससी, एसटी, ओबीसी आणि खुला वर्ग, त्यामध्ये पन्नास टक्के महिला आरक्षण असे आरक्षणाचे प्रवर्ग असणार आहेत.

5. त्या महापालिकेमध्ये याआधी कोणते आरक्षण झालेले आहे, ती चिठ्ठी बाजूला करून उर्वरित आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत.

6. या चिठ्ठ्या बॉक्समध्ये टाकताना सर्वांना दाखवल्या जातील, त्यानंतर पारदर्शक असणाऱ्या बॉक्समध्ये त्या टाकल्या जातील.

7. सर्व चिठ्ठ्या एकत्र झाल्यानंतर त्यातून एक-एक चिठ्ठी बाहेर काढून आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे.

8. त्यानंतर पुन्हा ५० टक्के महिला आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकून महिला आरक्षण काढले जाणार आहे.

9. या पद्धतीने राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

मुंबईच्या महापौरपदाकडे संपूर्ण राज्याचं विशेष लक्ष….

राज्यातील सर्वांत मोठी आणि प्रतिष्ठेची मुंबई महानगरपालिका असल्याने, मुंबईचा महापौर कोण होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जर मुंबई महापौरपदासाठी एसटी प्रवर्गाचे आरक्षण निघाले, तर मुंबईतील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, एसटी प्रवर्गातील जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

एकूणच, २२ जानेवारीची आरक्षण सोडत ही राज्याच्या महापालिका राजकारणाचा टर्निंग पॉइंट ठरणार असून, महापौरपदाच्या लॉटरीत कोणाचे नशीब फळफळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.पदाचे आरक्षण २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहामध्ये निश्चित होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---