नवी दिल्ली : पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत पदार्पण करणार आहे. इल्तिजा दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पारंपारिक कौटुंबिक बालेकिल्ला असलेल्या बिजबेहारा येथून निवडणूक लढवणार आहे. पीडीपीच्या राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय भूमिका बजावणाऱ्या इल्तिजा या पक्षप्रमुखांचे मीडिया सल्लागार म्हणून काम करत आहेत.
पीडीपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहबूबा मुफ्ती यांनी आपला राजकीय वारसा आपल्या मुलीकडे सोपवण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे, कारण मेहबुबा स्वतः आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत येत आहेत आणि त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.
8 नावांची यादी जाहीर
जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) ने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघ प्रभारींची यादी जाहीर केली आहे. पीडीपीचे सरचिटणीस गुलाम नबी लोन हंजुरा यांनी ही यादी जाहीर केली आहे.
अनंतनाग पूर्व – अब्दुल रहमान वीरी
देवसर – सरताज अहमद मदनी
अनंतनाग – डॉ.मेहबूब बेग
चरार-ए-शरीफ – नबी लोन हंजुरा
बिजबेहरा – इल्तिजा मुफ्ती
वाची – जी.मोहिउद्दीन वाणी
पुलवामा – वाहीद-उर-रहमान पारा
त्राल – रफिक अहमद नाईक
पीडीपी नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
कोण आहे इल्तिजा मुफ्ती?
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती (३७) आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. मुफ्ती कुटुंबाचा पारंपारिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दक्षिण काश्मीरमधील बिजबेहारा येथून इल्तिजा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. इल्तिजा यांनी दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि युनायटेड किंगडमच्या वारविक विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.