---Advertisement---
---Advertisement---
जिल्ह्यातील एरंडोल येथील एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळातील अध्यक्षांसह ११ सभासदांचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचे उपाध्यक्ष श्रीकांत काबरा, सचिव श्रीकांत घनश्याम काबरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
याबाबत पत्रकात म्हटले आहे की, एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळातील ११ जणांनी संस्थेविरूध्द संस्थेच्या ध्येयधोरणास व इभ्रतीस बाधा आणण्याचे काम केले. या विषयाची गंभीर दखल घेत संस्थेने स्वरूपी रद्द केले आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत कांतीलाल काबरा व सचिव श्रीकांत घनश्याम काबरे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. एरंडोल शिक्षण प्रसारक कार्यकारिणी सदस्य व संस्थेचे सभासद यांच्याविरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यामुळे त्यांचे सदस्यत्व पद कायमस्वरूपी रद्द करण्याचा ठराव संस्थेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आल्याचे उपाध्यक्ष श्रीकांत कांतीलाल काबरा व सचिव श्रीकांत घनश्याम काबरे यांनी कळविले.
कार्यमुक्त केलेले सभासद
अध्यक्ष शरदचंद्र द्वारकादास काबरे, कार्यकारिणी सदस्य नितीन बद्रीनाथ राठी, राजीव नंदलाल मणियार, अनिल किसनलाल बिर्ला, सतीश शंकरसिंग परदेशी, नितीन सुभाषचंद्र बिर्ला, परेश किशोर बिर्ला, सुनील मदनलाल झवर, नीरज शरदचंद्र काबरे, धीरज शरदचंद्र काबरे, सूरज शरदचंद्र काबरे यांचा समावेश आहे.