मासिक पाळीतले 5 दिवस प्रत्येक मुलींसाठी ते नक्कीच वेदनादायक असतात. विशेषत: ज्या मुलींना मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात आणि मांड्यामध्ये तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. काहींना मासिक पाळी एवढा त्रास होतो की त्यांना औषधे, हीटिंग पॅड वापरावे लागतात. औषधांमुळे आराम मिळतो पण त्याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल.
पोटावर झोपा-
पोटावर झोपणे फार चांगले मानले जात नाही. पण मासिक पाळीतील menstrual pain वेदना टाळण्यासाठी तुम्ही काही वेळ पोटावर झोपू शकता. पोटावर झोपल्याने खालच्या ओटीपोटात दुखणे आणि पेटके यापासून त्वरित आराम मिळतो
गुडघ्याखाली उशी-
मासिक पाळी menstrual pain दरम्यान खालच्या ओटीपोटात वेदना होतात. अशा परिस्थितीत गुडघ्याखाली उशी ठेवून झोपल्याने खूप आराम मिळतो. गुडघ्याखाली उशी ठेवून पाठीवर झोपल्यास भरपूर आराम मिळेल. त्यामुळे पोटावरील ताण कमी होतो. ज्यामध्ये मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो.
डाव्या बाजूला झोपा-
मासिक पाळीच्यादुखण्यापासून आराम मिळवायचा असेल तर डाव्या बाजूला झोपावे. यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल. स्त्रीरोग सांगतात की, पीरियड्समध्ये डाव्या बाजूला झोपल्याने गर्भाशयात रक्तपुरवठा वाढतो. ज्यामुळे मासिक पाळीच्या वेदनांमध्ये आराम मिळतो. डाव्या बाजूला झोपूनही यकृतावर दबाव येत नाही.
( तरी या साठी वैदकीय सल्ला घेणेत यावा )