काँग्रेसमध्ये आऊटगोईंग सुरु : मिलिंद देवरा शिवसेनेत दाखल

काँग्रेस पक्षातून मोठे नेते बाहेर पडण्याचे सत्र सुरु आहे. यामध्ये मिलिंद देवरा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाबा सिद्दीकी यांचा समावेश आहे. काँग्रेसला पुन्हा धक्का बसला आहे. पक्षाची भूमिका माध्यमांकडे मांडणाऱ्या व्यक्तीनेच हा धक्का दिला आहे. काँग्रेस पक्षाची समर्थपणे बाजू मांडणारे व्यक्तिमत्व शिवसेनेत गेले. काँग्रेस पक्षाचे प्रवक्त राजू वाघमारे यांनी काँग्रेस पक्षाचा हाथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.

काँग्रेसची अवस्था बिकट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजू वाघमारे यांचे शिवसेनेत स्वागत केले. त्यानी वाघमारे यांना शिवसेनेचा भगवा ध्वज दिला. यावेळी बोलताना राजू वाघमारे म्हणाले की, काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे पक्षाची अवस्था वाईट झाली आहे. काँग्रेस पक्ष आता उद्धव ठाकरे यांच्या हाताखाली दबलेला पक्ष झाला आहे. सांगली आणि भिवंडी येथील जागेबाबत असाच निर्णय झाला. सांगलीची जागा शिवसेनेने जाहीर केली. भिवंडीची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. या सर्व प्रकाराचा परिणाम माझ्यावर झाला आहे. यामुळे मी कॉमन मॅन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश घेत आहे. भविष्य काय आहे, हे भविष्य दाखविण्यासाठी आज चांगलं दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास काय आहे, हे दाखवून दिले आहे. त्यांनी कमी वेळेत राज्याचा मोठा विकास केला आहे. आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्री यांनी असे काम केले नाही. हे विरोधकांना देखील मान्य करावे लागेल.