शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी राजकीय व्देष बाजूला ठेवणार!

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२२ । दूध उत्पादक संघातील विजयानंतर आ. मंगेश चव्हाण यांनी ‘तरुण भारत’ कार्यालयास सोमवारी सायंकाळी सदिच्छा भेट दिली.  शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी राजकीय व्देष बाजूला ठेवून दूध संघात काम करणार असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी आमदार चव्हाण यांच्यासह दूध संघाचे नवनियुक्त संचालक अरविंद देशमुख यांचा सर्जना मीडिया सोल्युशन्स प्रा.लि.चे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा, सचिव संजय नारखेडे, निवासी संपादक चंद्रशेखर जोशी यांनी त्यांचे स्वागत केले.

जळगाव जिल्हा दूध उत्पादक ‘टॉप टेन’मध्ये राहील
आमदार चव्हाण म्हणाले की, शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी दूग्ध व्यवसाय हा जिल्ह्यातील बळीराजाचा महत्त्वाचा जोड व्यवसाय आहे. शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी राजकीय व्देष बाजूला ठेवून दूध संघात काम करणार आहे. राज्यात जळगाव जिल्हा दूध उत्पादक ‘टॉप टेन’मध्ये राहील, असे प्रयत्न असतील. दुधाचे उत्पादन, दर्जा, मार्केटींगच्या माध्यमातून दूध संघात धवलक्रांती आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मेडिकल असो.तर्फे सत्कार
यावेळी जिल्हा मेडिकल असोसिएनतर्फे आमदार मंगेश चव्हाण, संचालक अरविंद देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष सुनील भंगाळे, उपाध्यक्ष श्यामकांत वाणी, सचिव अनिल झंवर, संजय नारखेडे, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद बर्‍हाटे आदी उपस्थित होते.