अग्रलेख
मानवी मनाने विज्ञानाच्याच मान्यताप्राप्त संशोधन प्रक्रियेने, विज्ञानाला आपले ‘स्वतंत्र’ सूक्ष्म रूपाने का होईना, पण अस्तित्व आहे, हे मान्य करायला लावणे, ही गोष्ट विज्ञानाच्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या प्रदीर्घ प्रवासातील, १९ व्या शतकातील एक अतिशय महत्त्वाचे वळण ठरले. beyond time and space संशोधकांच्या दृष्टीने भौतिक विज्ञानाच्या (मॅटर) जोडीने आता अतींद्रिय विज्ञान (मेंटल पॉवर) हे फार मोठे क्षेत्र उपलब्ध झाले. जगातील अनेक प्रमुख देशांमधील संशोधक या क्षेत्रात आपापले योगदान देऊ लागले. त्याचा परिणाम म्हणजे मनाच्या ठायी असलेल्या अनेक सूक्ष्म शक्तींचा प्रत्यय, अनुभूती संशोधकांना आली. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला. संशोधनाला गती आली डॉ. हेन्री पिअर्सने याला ‘ए इम्पॉर्टंट पॉझिटिव्ह कर्व्ह’ असे म्हटले तर शेरिंग्टन या शास्त्रज्ञाने याचे वर्णन ‘अ सायन्स ऑफ बियाँड स्पेस अँड टाईम’ असे केले.
याचाच स्पष्ट अर्थ असा की, आधुनिक विज्ञान हे ख-या अर्थाने ‘स्थुलातून सूक्ष्माकडे गेले. विज्ञानाच्या परिभाषेत डॉ. जे. बी. -हाईन म्हणतात तसे- ‘फ्रॉम थ्री डायमेन्शनल लेव्हल टु बियाँड स्पेस अँड टाईम लेव्हल’पर्यंत गेले. थ्री डायमेन्शनस् म्हणजे ‘तीन अवस्था (अवस्थात्रय) आणि बियाँड स्पेस अँड टाईम म्हणजे अवकाश आणि काल. आधुनिक विज्ञानाने प्रयोगाने सिद्ध केलेल्या या संकल्पना व विज्ञान भारतीयांना वेद-उपनिषद काळापासून स्पष्टपणे विदित आहेत. गणपती अथर्वशीर्षातील ‘त्वं अवस्थत्रयातीतः। त्वं कालप्रयातीतः। त्वं शक्तित्रयात्मकः।’ या संकल्पना काय दर्शवितात? आधुनिक विज्ञानच वर्णन करताहेत ना? आपल्या मूळ ठेव्याचे, संचिताचे मूलभूत चिंतन करण्याची गरज आज आहे. त्यासाठी चतुर्थीचा उपवास आणि एकवीस मोदकांच्या नैवेद्यापलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे. ‘बुद्धि दे गणनायका…।’
मनाच्या विविध शक्तींचा आविष्कार
या सर्व संशोधित प्रमेयांचा चांगला विधायक परिणाम झाला. त्याने वैचारिक परिवर्तन झाले. मनुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. मानवी देह आणि मन म्हणजे केवळ रक्त, मांस, मज्जा, सप्तधातू यांचा संघात (कॉम्बिनेशन) नाही तर त्याहीपेक्षा काही विशेष सामथ्र्य यांत आहे, याची जाणीव आधुनिक विचार%LS����