---Advertisement---
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचा लँडिंगदरम्यान सुदैवाने मोठा अपघात टळला. मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या या प्रवासात हेलिकॉप्टरने नियोजित हेलिपॅडऐवजी चुकून गाड्यांच्या पार्किंगमध्ये उतरवण्यात आले.
पुण्यात पोहोचताना पायलटकडून झालेल्या या चुकीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. हेलिकॉप्टरचे रोटर्स सुरू असतानाच आसपास उभ्या असलेल्या वाहनांना धक्का लागण्याची शक्यता होती. मात्र, परिस्थिती नियंत्रणात ठेवत हेलिकॉप्टर सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. या घटनेत मंत्री छगन भुजबळ यांच्यासह कोणालाही इजा झाली नाही.
भुजबळ हे महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी पुण्यात आले होते. मात्र, त्यांच्या प्रवासातील ही अनपेक्षित घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
घटनेबाबत मानहती छगन भुजबळ यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून या प्रकरणाची दखल सुरक्षा यंत्रणांनी घेतली असून तपास सुरू करण्यात आला आहे. पायलटकडून झालेली ही चूक नेमकी तांत्रिक कारणांमुळे झाली की मानवी दुर्लक्षामुळे, याचा सखोल शोध घेतला जात आहे.









