मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत वक्तव्य केले होते. मुस्लिमांच्या ओबीसी नोंदी सापडत असल्याने त्यांना देखील ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जावे अशी मागील केली होती. याला मंत्री छगन भुजबळ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुस्लिम आरक्षणाबाबतच्या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ओबीसी समकक्ष असणाऱ्यांना आरक्षण दिले जात आहे. त्यास आमचा कधीच विरोध नव्हता. तुझा अभ्यास कमी आहे. 25 वर्षापूर्वीच कुरेशी, बागवान या घटकांना आरक्षण दिले असल्याचे स्पष्ट केले. ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, लक्ष्मण हाके आम्ही सगळे एकत्रित आहोत, असे देखील छगन भुजबळ म्हणाले.
मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जरांगे पाटील यांच्या मागणीची भुजबळ यांनी टर उडवली. ‘तुझा अभ्यास कमी आहे. 25 वर्षांपूर्वी कुरेशी, बागवान या घटकांना आरक्षण दिले आहे. दिलीपकुमार यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. त्याच वेळी इकडाचा व्यवसाय तिकडा व्यवसाय साम्य असणारांना आरक्षण दिलं गेलं.’, असे भुजबळ म्हणाले.
‘उगाच काही माहिती नसताना बोलायचं म्हणून बोलायचं. मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी तर कधी धनगर समाजाला खुश करण्यासाठी तर कधी वंजारी समाजाला खुश करण्यासाठी बोलायचं. तुम्ही अभ्यास करा त्यासाठी’ असा टोला देखील जरांगेंना छगन भुजबळ यांनी लगावला.