जळगाव : भाजपमध्ये प्रवेश केला आहे मात्र तो पक्षाने जाहीर केला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे मात्र तो अध्यक्ष शरद पवार यांनी स्वीकारलेला नाही. त्यामुळे अजून काही दिवस भाजपकडून वाट बघेल आणि मूळ राष्ट्रवादी पक्षात पुन्हा कामाला लागेल, भूमिका आ. एकनाथराव खडसे यांनी माध्यमांकडे मांडली होती. आता यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत थेट आमदार एकनाथराव खडसे यांना दुट्टपी भूमिका सोडून एकच भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान दिले. ते जळगावात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
मंत्री महाजन पुढे म्हणाले की, वरिष्ठांनी जर त्यांचा प्रवेश केलेला आहे तर आम्ही त्याला थांबवणारे कोण आहोत ? ते सोयीचं राजकारण करतात. तुम्ही जर म्हणताय मी रक्षा खडसे यांचे काम केलं तर मग तुम्हाला शरद पवार साहेब पक्षात कसे काय ठेवताय ? तुमच्या आमदारकीचा राजीनामा का मागत नाही ? हे सगळं सोयीच राजकारण चाललेला आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांनी एक भूमिका घ्यावी. एकनाथ खडसे सोयीचे राजकारण करतात ते सून आली तर आपण बीजेपीच काम करतो, आता राष्ट्रवादीत गेले की मी मुलीचं काम करतो, मी कुठे आहे हे मला समजत नाही. मी भाजपात आहे की राष्ट्रवादीत आहे हे मला कळत नाही असे ते म्हणता आहेत.
आमच्या मंत्री रक्षा खडसे म्हणाले आहेत मला मदत केली. तुम्ही त्या पक्षाचे आमदार आहात त्यांच्याकडून तुम्ही आमदारकी भोगतात पद घेतात आणि इकडे कस काय मदत करतात ? तरीसुद्धा शरद पवार साहेब तुम्हाला काढत नाही तर एवढं प्रेम का ? त्यांची दुटप्पी भूमिका असून ते दोन्ही दगडांवर पाय ठेवत आहेत. राजकारणात अशी दुहेरी भूमिका घेतलेली चालणार नाही. आपल्या घरात सर्व पद पाहिजे, वेगवेगळ्या पक्षांचे पाहिजे हा कुठला प्रकार आहे ? आपण एकच भूमिका स्पष्ट करावी.
ते म्हणता वरिष्ठांनी त्यांना प्रवेश दिलेला आहे त्या वरिष्ठ निर्णय घेतील ना ? ते म्हणतात त्यांचा डायरेक्ट संपर्क वरती आहे ? वरिष्ठ नेते अमित शाह, पक्ष अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जर सांगितले आम्ही प्रवेश दिला आहे तर आम्ही नाकारणारे कोण ? आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत असेही मंत्री महाजन म्हणाले.