जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देशाच्या राष्ट्रपतींकडे एक वेगळीच मागणी केली आहे. आम्हाला खून करण्याची परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी थेट देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी एक पत्र सोशल मीडियावर प्रकाशित केले आहे. त्यानंतर या पत्राची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी रोहिणी खडसे कोणाचा खून करणार आहेत असा सवाल उपस्थित केला आहे.
मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी रोहिणी खडसे यांनी लिहलेल्या या पत्रावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहिणी खडसे कोणाचा खून करणार आहेतहे त्यांनी सांगावे, अशा शब्दात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांना जोरदार टोला लगावला आहे.
महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या संदर्भात रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले असून एक खून माफ करावा अशी विनंती केलेली आहे. यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘रोहिणी खडसे काय म्हणाला मला त्याबाबत माहिती नाही मात्र त्या कोणाचा खून करत आहेत त्याच नाव सांगावं’ अस म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोहिणी खडसे यांना टोला लगावला आहे..