---Advertisement---

Ramdas Athawale : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले जळगाव जिल्हा दौऱ्यावर

---Advertisement---

जळगाव : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले उद्या मंगळवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून, कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

मंगळवार, ०८ एप्रिल २०२५ रोजी ०५:३० वाजता पाटलीपुत्र एक्स्प्रेसने जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन. संध्याकाळी ५:४५ वाजता मोटारीने जळगाव शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी०९:४५ वाजता जळगाव शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यासोबत सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर चर्चा.

सकाळी १०:१५ वाजता जळगाव शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद. सकाळी११:३० वाजता आकाशवाणी चौकातील लाड वंजारी मंगल कार्यालयात नागरिकांच्या मेळाव्यात सहभाग. दुपारी १२:३० वाजता आकाशवाणी चौकातून मोटारीने बुलढाण्याकडे प्रयाण.

समाज कल्याण कार्यालयात अभ्यागत भेटीसाठी विशेष वेळ निश्चित

जळगाव : मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र शासनाने 100 दिवसांचा कृती आराखडा निश्चित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय, जळगाव या कार्यालयाशी संबंधित नागरिकांच्या अडचणी, प्रश्न, समस्या इत्यादी जाणून घेऊन त्यांचे नियमानुसार निराकरण करण्यासाठी, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड, जळगाव येथे अभ्यागतांना भेटण्यासाठी कार्यालयीन दिवशी दुपारी ३.०० ते ५.०० वाजेपर्यंतची विशेष वेळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी नागरिकांना या वेळेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment